आई
आई म्हणूनी आता कोणाला साद
घालू
आठवणीतच उरली ती कुणासवे मी
चालू
होती आई जेव्हा माझे
मीपण जपलेले
शोधत आहे अजुनी ते
बालपण हरवलेले
जवळून वाहत नाही आता मायेचा
झरा
रुसुनी गेला आहे येथून
वाहता वारा
थकुनी जेव्हा येतो आई तुलाच आठवतो
लवकर निघून ये ना आई निरोप पाठवतो
किती केली तुला विनवणी तरी नाही आली
फुलत नाही खरेच आता हसू माझ्या गाली
सुखे लोळती पायाशी पण सोबत तू नाही
तूच हवी माझ्या पाठीशी, नको मला काही
----- सुनिल पवार
s
----- सुनिल पवार
s
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा