चांदोबा तुझ्या घरी रोजच दिवाळी
पणत्या दिसती मला रोज आभाळी
लाडू, चकल्या
करते का तुझी आई
फराळाला येऊ का मी आणि ताई
उटणे लावून करु आपण दोघे स्नान
ताई काढेल रांगोळी अंगणात छान
फुलबाजी आणि
फटाके उडवायचे का
आवाज करुन ताईला चिडवायचे का
मोठा आकाशकंदील आपण लावू या
दोघे मिळून आनंदाने गाणे गाऊ या
-------सुनिल पवार
-------सुनिल पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा